Thursday, December 30, 2010

बायको नावाचा प्राणी (मित्र)

आपण मनुष्याला प्राणी म्हणतो. म्हणजे आपली जमात प्राण्यातच् मोडते पण आपल्याला देवाने इतर प्राण्यांपेक्षा विलक्षण बुद्धी दिली आहे.म्हणुन आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे. अर्थात याला काही मनुष्यप्राणी अपवाद आहेत. बघा आजुबाजुला. भरपुर सापडतील. अशाच एका प्राण्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचे नाव आहे- बायको.काय समस्त नवरेबुवा-चळाचळा कापले ना! नाव ऐकल्याबरोबर. हिच तर खासियत आहे ह्या प्राण्याची.

आपल्या सारखेच दोन हाथ, दोन पाय, दोन डोळे, दोन कान असतात यांना पण डायनॉसॉर सुद्धा आपापल्या बायकांना घाबरत होते असे ऐकिवात आहे. आपण मस्त सुट्टीच्या दिवशी उशिरा ऊठलेलो असतो. छान अंघोळ न करता पेपर वाचत असतो त्याचवेळेस बरोबर त्यावेळेसच हाक येते "अहो जरा इकडे येता का ? ". आपण लगेच समजावं कि आपल्या सुट्टीची वाट लागली आहे.

सुट्टीच्या दिवशी घर आवरायला काढणे म्हणजे ह्या प्राण्याचा आवडीचा छळ. काय पटतेय ना? असंच असतं बाबांनो...शादीके लड्डु जो खाये वो पछताये...

हे प्राणी एका रुमालाच्या खरेदीला गेले तर दोन रिक्षाभरुन खरेदी करुन येतात.
बाहेर २००रुपयात मिळणारी वस्तु मॉलमधुन १००० रुपयात घेवुन येतात.
मेकअपला किमान अर्धा तास तर रॉंग नंबरवर १० मिनिटे बोलतात.
कामासाठी मैत्रिणीला फोन केला तर कामाव्यतिरिक्त इतरच बोलतात. आणि कामाचे बोलणे राहिले म्हणुन पुन्हा फोन करतात.
भलेभले भाई लोक बाहेरच्यांसाठी 'भाई' असतात पण घरी त्यांचं याच्यासमोर  काही चालत नाही..
यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ते माहित नसते पण शाहिद-प्रियंकाचे का ब्रेक झाले याची इत्यंभुत माहिती असते.
गाडीवर मागे असताना आपल्या नवरोबाचे कुठे लक्ष आहे याचे उपजत ज्ञान असते..मग भले त्याचे लक्ष कुणा सुंदरीकडे असो वा नसो.
अश्या खुप गोष्टी आहेत या प्राण्यांच्या ज्या समस्त नवरे मंडळींना या जन्मात समजणे कठीण आहे. म्हणजे कुठल्याच जन्मात समजणार नाही. कारण प्रत्येक जन्मात कुणी  तरी बायको असणारच ना !

काही सुचना :-
या प्राण्यांशी खोटं बोलु नका. लगेच पकडले जाल. आठवा..बिअर पिऊन आल्यानंतरची रात्र..
आणि खोटे बोललाच तर आधी फिल्डिंग लावुन ठेवा.
यांच्यासोबत असताना परस्त्री कडे पाहु नका. यासाठी मनाला कसे सावरावे हा क्लास लावा.
शॉपिंगला जाताना पाकिट घरी विसरा. ( TV वर ) .
यांच्यासोबत शॉपिंग करण्यासाठी खुप स्टॅमिना लागतो. त्यासाठी दररोज पळणे, चालणे, जिना चढणे या सारखे (दमवणारे) व्यायाम करा.
अशा  रितीने आज आपण या प्राण्यांची एक बाजु पाहिली. आता दुसरी बाजु पुढच्या पोस्टमाध्ये.
विशेष टिपणी : या पोस्ट मधुन कुणालाही दुखवण्याचा हेतु नाहिये. हा एक निखळ मनोरंजनाचा(?) प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment