माझा ब्लॉग !!
माझं नेटवरचं पहिलं लिखाण!
वा! मझा आ गया!
पण अहो वाचणार कोण? कुणाकडे वेळ आहे? तुमच्याकडे आहे? नाही ना...मग मी का लिहीतो आहे..
तर मी लिहितो माझ्या आनंदासाठी. अन् तुम्हाला आनंद देण्यासाठी ( हा काय - ती देवळात असते ना, ती आपण वाजवतो अन् मग नमस्कार करतो,तीच-आनंद देणार) असं जरी तुमच्या मनात आलं तरी मी लिहिणार..काय वाट्टेल ते झालं तरी.
तर मित्रांनो आज किती तारिख आहे? आठवा..आठवा...आठवतेय का? आठवली....२६ नोव्हेंबर. आज बरोब्बर दोन वर्षा आधी मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी हा हा कार माजवला. कित्येक जण शहीद झाले. अन् त्यांचे कुटुंबीय निराधार. चला आज आपण सारे आपल्या सो कॉल्ड बिझी शेड्युल्डमधुन वेळ काढु आणि शहीदांना श्रध्दांजली वाहु यात. मनात त्यांची आठवण काढा फक्त अन् मुंबईकरांना त्याच्या सहनशीलतेसाठी सलाम ठोका!
आज जरा सिरिअस दिवस आहे म्हणुन इतकेच. पुढच्यावेळी तुम्हाला नक्की हसवणार हां...अहो हसा आणि लठ्ठ व्हा असा निसर्गाचा नियम आहे..आणि अति लठ्ठ झालात तर डोण्ट लुज युवर माईंड...रुजुता दिवेकर आहे ना !
शहीदांसाठी--
चले थे ख्व़ाब आँखोमे लिये..
कमबख्त कब बोझ़ल हुए पता ही न चला..